
अमेरिकेत जवळपास सात दशकानंतर एका महिलेला फाशी देण्यात आली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेत जवळपास सात दशकानंतर एका महिलेला फाशी देण्यात आली आहे. लीजा मोंटगोमेरी (Lisa Montgomery) असं त्या महिलेचं नाव आहे. लीजाला बुधवारी सकाळी फाशी देण्यात आली. लीजाने 16 वर्षांपूर्वी एका गर्भवती महिलेची हत्या केल्यानंतर पोट फाडून आठ महिन्याच्या बाळाला गर्भातून काढत आपल्या ताब्यात घेतले होते. याआधी अमेरिकी सरकारने 18 सप्टेंबर 1953 साली ब्राऊनी हेडीला 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्त्येप्रकरणी फाशीची शिक्षा दिली होती.
बुधवारी रात्री या निर्णयाची कॉपी मिळाल्यानंतर फेडरस ब्यूरो ऑफ प्रीझनने लीजा मोंटेगोमेरीच्या फाशीच्या प्रक्रियेला पुढे सुरु केले. 8 व्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपील द्वारा लावण्यात आलेल्या स्थगितीच्या निर्णयाला न्यायालयाने हटवले. याआधी लीजाच्या फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने लीजाच्या फाशीचा मार्ग मोकळा केला.
कोरोनावरील लस आज सोलापुरात येणार ! जनजागृतीसाठी शिक्षकांची घेतली जाणार मदत
2004 मध्ये लीजाने गर्भवती महिलेची हत्या केली होती
लीजा मोंटेगोमेरीला टेक्साच्या कार्सवेलमध्ये फेडरल मेडिकल सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे ठिकाण मानसिक रुपाने आजारी कैद्यांना ठेवण्यासाठी आहे. मोंटेगोमेरीच्या वकीलांना कोर्टात बचाव करताना तर्क दिला होता की लीसा मानकिसरित्या ठीक नाही आणि त्यामुळे तिला फाशीची शिक्षा देणे बरोबर ठरणार नाही. लीसाला गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिकरित्या त्रास देण्यात आला आहे. त्यामुळे ती गंभीररित्या मानसिक आजारी रुग्ण आहे, असं वकीलांनी म्हटलं.