Man Vs Wild: बेअर ग्रिल्सने PM मोदींचा फोटो केला शेअर आणि म्हणाला...

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 6 February 2021

शेतकरी आंदोलनाच्या समर्थन आणि विरोधात मोठी चर्चा घडत असतानाच बेअर ग्रिल्सने हे टि्वट केले आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी रिहानाच्या टि्वटनंतर देशातील अनेक दिग्गजांनीही या विषयावर टि्वट केले.

नवी दिल्ली- जगभरात लोकप्रिय ठरलेला टीव्ही शो 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' (Man Vs Wild) चा होस्ट बेअर ग्रिल्सने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर करत टि्वट केले आहे. माझ्या आवडीच्या फोटोंपैकी हा एक. डिस्कव्हरीवर आमच्या जंगल ऍडव्हेंचरदरम्यान भिजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चहा प्यायलो होतो. मास्क आणि पदाच्या मागे आपण सर्वजण एकसारखे आहोत, हे हा क्षण पाहिल्यानंतर लक्षात येते, असे बेअर ग्रिल्सने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या समर्थन आणि विरोधात मोठी चर्चा घडत असतानाच बेअर ग्रिल्सने हे टि्वट केले आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी रिहानाच्या टि्वटनंतर देशातील अनेक दिग्गजांनीही या विषयावर टि्वट केले. अशातच बेअर ग्रिल्सच्या टि्वटचे वेगळे अर्थ काढले जात आहे. परंतु, मॅन व्हर्सेस वाइल्डच्या बेअर ग्रिल्सने शेतकरी आंदोलनावर मात्र कोणतेही वक्तव्य केलेले नाही. 

हेही वाचा- भारतरत्नवर रतन टाटा म्हणाले, लोकांच्या भावना कौतुकास्पद पण...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बेअर ग्रिलबरोबर डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या मॅन व्हर्सेस वाइल्डच्या एका विशेष भागात दिसले होते. त्यावेळी हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर ट्रेडिंगमध्ये होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man vs Wild Host bear grylls Share photo with pm narendra modi