Time : कधीही वेळ न चुकवणारा 20 मिनिटं उशिरा पोहोचला अन् बॉसने थेट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job

Time : कधीही वेळ न चुकवणारा 20 मिनिटं उशिरा पोहोचला अन् बॉसने थेट...

Men Late In Office : आपल्यापैकी अनेकांना कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी वेळेत पोहचण्याची सवय असते वेळेत न पोहोचल्यास वेळेप्रिय असलेल्या व्यक्तींना काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं होतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं मात्र, याचा फटका त्याला बसला. या घटनेबाबत संबंधित कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्याने Reddit वर शेअर केली आहे. ही घटना कुठे घडली हे कळू शकलेले नाही.

हेही वाचा: RBI : कर्जदारांना आज झटका बसण्याची शक्यता; रेपो दरात होणार वाढ?

त्याचे झाले असे की, 7 वर्षांहून अधिक काळ प्रथमच कार्यालयात उशीरा पोहोचल्यामुळे एका व्यक्तीला त्याच्या मालकाने नोकरीवरून काढून टाकले. ही घटना काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्याने Reddit वर शेअर केली होती. Reddit वरील अँटीवर्क फोरमवर ही पोस्ट शेअर केली गेली आहे. यात संबंधित कर्मचाऱ्याच्या सहकार्याने कंपनीमध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करताना माझा सहकारी पहिल्यांदाच उशीरा आला. त्याला केवळ 20 मिनिटे उशिर झाला होता या एकाच कारणावरून संबंधित कंपनीच्या मालकाने त्याला थेट नोकरीवरूनच काढून टाकले.

हेही वाचा: 750 विद्यार्थिनींच्या मेहनतीने यंदा अंतराळात फडकणार 'तिरंगा'; ISRO चाही पुढाकार

निर्णयाला विरोध करणार

दरम्यान, उशीरा कामावर आल्याने थेट नोकरीवरून काढूण टाकणाऱ्या सहकाऱ्याला पुन्हा कामावर घेईपर्यंत कार्यालयातील कर्मचारी विरोध करणार असल्याचे पोस्टकर्त्याने म्टटले आहे. यात त्याने "उद्या, मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना उशीर होईल आणि जोपर्यंत ते त्याला पुन्हा कामावर घेत नाहीत तोपर्यंत उशीर होत राहील." "7 वर्षांहून अधिक काळ कधीही उशीर न करणारा सहकारी जेव्हा उशीरा येतो तेव्हा त्याला पहिल्यांदा काढून टाकले जाते." असे पोस्ट कर्त्याने नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे. या घटनेची पोस्ट Reddit वर शेअर केल्यापासून या पोस्टला 79 हजारांहून कमेंट्स आल्या असून अनेकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

Web Title: Man Was Fired For Being 20 Minutes Late To Work For First Time In 7 Years Read Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..