पाकिस्तानात साजरा हाेणार मराठी भाषा गौरव दिन; विविध स्पर्धांचे आयाेजन

सिद्धार्थ लाटकर
Friday, 22 January 2021

अनेक महामानवांची चरित्रे कराची येथे महाराष्ट्र भाषा गौरव दिनतर्फे पाठवले जाणार आहेत.

सातारा : मराठी भाषेवर अमाप प्रेम करणा-या दिलीप पुराणिक यांनी चक्‍क पाकिस्तानमधल्या मुलांना विशेषतः कराची येथील मराठी कुटुंबियांमध्ये मराठी भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केला. लॉकडाऊनचा पूरेपूर फायदा उठवत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. आता तर सुमारे 75 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा चंग बांधला आहे.

पुढील महिन्यात येणार्‍या 27 फेब्रुवारीला म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी सातारा येथील एका समूह कराचीतील मराठी समुदाया सोबत मराठी भाषा गौरव दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करणार आहेत. त्यासंबंधीची झूमच्या माध्यमातून एक बैठक  येत्या रविवारी (ता. 24) आयोजित केली गेली आहे.

या उपक्रमासाठी दिलीप पुराणिक यांनी पुढाकार घेतला आहे. ते भारतीय आयुर्विमा महामंडळात कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत करिअर मार्गदर्शनाबाबतची हजारो व्याख्याने देत युवा पिढीला मार्गदर्शन केले आहे. पुराणिक यांचे मूळगाव भुसावळ हे आहे. मराठवडा, विदर्भात त्यांचे युवा पिढीसाठी मोठे योगदान राहिले आहे. खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात त्यांच्या पत्नीची बदली झाल्याने श्री. पुराणिक हे देखील साता-यात आले. 

मराठी भाषेवर अमाप प्रेम करणा-या पुराणिक यांनी चक्‍क पाकिस्तानमधल्या मुलांना विशेषतः कराची येथील मराठी कुटुंबियांमध्ये मराठी भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केला. लॉकडाऊनचा पूरेपूर फायदा उठवत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. आता तर सुमारे 75 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा चंग बांधला आहे. पाकिस्तानातल्या मराठी कुटुंबाची मराठी शुद्ध असावी यासाठी त्यांच्याशी सातत्याने मराठी बोलावं लागणार आहे. या संकल्पनेतून तेथील कुटुंबियांशी, मुलांशी झूमच्या माध्यमातून एक बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठी साता-यातील शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीने पुढाकार घेतला आहे. या सर्वांना अनेक मराठी भाषेवर प्रेम करणा-यांचे सहकार्य मिळत आहे.

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पाकिस्तानमधील शे पाचशे कुटुंबांना मराठी भाषेवर प्रेम असल्यचे त्यांचे लक्षात आले. परंतु शुद्ध मराठी भाषा मुले बोलत नसल्याने तसेच उर्दु भाषेचा प्रभाव पडल्याने पुराणिक यांनी संबंधित मुलांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. महाराष्ट्र पाकिस्तान मराठी सेवा संघाची स्थापना करुन पुराणिक यांचे कार्य अहोरात्र सुरु आहे. यासाठी त्यांना विशाल रजपूत, राजेश नाईक, प्रकाश गायकवाड, देवानंद सांडेकर अशा अनेक मराठीजनांचे सहकार्य लाभत आहे. येत्या 27 फेब्रुवारीस कराचीत मराठा राजभाषा दिन साजरा करण्यासाठी ही सर्व मंडळी सरसावली आहेत. त्यासाठी येत्या रविवारी (ता.24) एका झूम बैठकीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमधील नागरिक संवाद साधतील. किमान शंभर जण या ऑनलाइन मीटिंगमध्ये सामील होणार आहेत. त्यातून मुलांसाठी कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करणे असे उपक्रम घेण्याचे निश्‍चित होईल. या बैठकीत सुमारे शंभरजण सहभागी होतील असा अंदाज पुराणिक यांनी तरुण भारत या दैनिकाशी बोलताना नुकताच व्यक्त केला आहे.

मराठी भाषा तिकडच्या मुलांनी शिकावी आणि मराठी संस्कृतीचे जतन करावे यासाठी अनेक मराठी पुस्तके, चार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले इत्यादी अनेक महामानवांची चरित्रे कराचीमधील मुलांना पाठविण्याचा मानस आहे.
 - दिलीप पूराणिक

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Language Day Will Celebrate By Indians In Karachi Pakistan Satara Marathi News