
जगभरातील मराठी भाषिक समुदायांमध्ये. मराठी भाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार आणि कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे.
मराठी भाषा बोलणारे संबंध भारतात कोट्यवधी लोक आहेत. याशिवाय जागतिक पातळीवर मराठी नवव्या स्थानावर आहे. एवढेच नाही भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानमधील कराची या शहरात मराठी बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ ७०० मराठी भाषिक पाकिस्तानी नागरिक कराचीमध्ये आपली मूळ मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.