अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - अमेरिकेच्या व्हिसा देण्याच्या धोरणाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 2017मध्ये  एकूण अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 16 टक्के घट झाली आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांची घट 27 टक्के आहे. 

अमेरिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये 5.02 लाख विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला होता. मात्र, 2017मध्ये 4.21 लाख विद्यार्थ्यांनांचा व्हिसा देण्यात आला. 

परिणामी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पर्याय म्हणून आता कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news american students visa