जर्मनीच्या चॅन्सेलरपदी मर्केल यांची निवड

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सेलरपदी संसदेने आज अँजेला मर्केल यांची चौथ्यांदा निवड केली. 
संसदेत खासदारांनी 364 विरुद्ध 315 मतांनी मर्केल यांची निवड केली.

सन 2005 पासून त्या जर्मनीच्या चॅन्सेलर आहेत. 709 सदस्यांच्या संसदेत मर्केल यांच्या ख्रिस्तीयन डेमोक्रॅटिक युनियन, ख्रिस्तीयन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक या पक्षांच्या आघाडीकडे 399 सदस्यांचे संख्याबळ आहे. 

मर्केल यांच्या मंत्रिमंडळात अर्थ, परराष्ट्र व अंतर्गत मंत्रालयासाठी नवे चेहरे देण्यात आले आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या संसदेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याने नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

सध्याची सत्तारूढ आघाडी 2021 पर्यंत कायम राहणार आहे. तोपर्यंत या पक्षांनी एकत्र काम करण्याचे ठरविले असल्याने राजकीय पेच निर्माण होणार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news angela merkel Germany