जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

हार्बिन (चीन) - जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला उत्तरपूर्व चीनच्या हार्बिन शहरात सुरवात झाली आहे. येत्या महिन्यात हजारो पर्यटकांना हे फेस्टिवल आकर्षित करण्याची अपेक्षा केली जात आहे. या 34 व्या हार्बिन इंटरनॅशनल आईस अँड स्नो स्कल्पचर फेस्टिवलची सुरवात 5 जानेवारी ला झाली आहे. हे फेस्टिवल फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत चालणार आहे. 15 आणि 23 फेब्रुवारीच्या दरम्यान चिनी नववर्षाच्या उत्सवात पर्यटक संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

येथील संगणक-नियंत्रित एलईडीज हे इतिहासातील अत्यंत महत्वाकांक्षी कलाकृती दर्शविते. या कलाकृतींमध्ये बीजिंगचे टेम्पल ऑफ हेव्हन, मॉस्कोचे रेड स्क्वेअर आणि बँगकॉकचे बुद्ध मंदिर यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत.

2017 मध्ये झालेल्या या फेस्टिवलने शहरासाठी अंदाजे 28.7 अब्ज युआन (4.4 अब्ज) इतका पर्यटन महसूल मिळवून दिला होता. असे शहराच्या पर्यटन ब्यूरोच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. या फेस्टिवल मधील शिल्प वितळतील याविषयी पर्यटकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण हार्बिन चीनच्या सर्वात थंड शहरांपैकी एक आहे. येथे कायम -35 डिग्री सेल्सियस इतके तापमान असते. 
फेस्टिवलची सुरवात 1983 मध्ये झाली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chaina global worlds largest ice festival