ट्रम्प घेणार उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

वॉशिंग्टन - दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग इयू योंग यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची मे महिन्यात भेट घेणार आहेत.

वॉशिंग्टन - दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग इयू योंग यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची मे महिन्यात भेट घेणार आहेत.

व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या सराह सँडर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच होणाऱ्या यू.एस. नॉर्थ कोरिया परिषदेसाठी किम जोंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारले आहे. तसेच उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांनी आत्तापर्यंत वारंवार आण्विक हल्ला करण्यासंदर्भात धमक्या दिल्या आहेत. मात्र आता ते अशा प्रकारच्या धमक्या देणार नाहीत किंवा अण्वस्त्र चाचणीही करणार नाहीत त्या मुद्द्यावर ते शांत झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प हे किम जोंग यांना भेटण्यासाठी तयार झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

या दोघांनीही अण्वस्त्र हल्ल्याची धमकी एकमेकांना दिली आहे. तसेच या दोघांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. त्यामुळे या दोन देशांमध्ये युद्ध होण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमिवर, होणाऱ्या चर्चेतून शांततापूर्ण मार्गच निघेल अशी अपेक्षा सँडर्स यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे जगाचे लक्ष असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news donald trump kim jong un