रशियातील विमानतळावर पडला सोन्याचा पाऊस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

मॉस्को- पैशाचा पाऊस आपण एकला आहे. परंतु, रशियामध्ये चक्क सोन्याचा पाऊस पडलाय. रशियात एका विमानाचा दरवाजा उघडा राहिल्याने विमानातून थेट धावपट्टीवरच तीन हजार किलो सोन्याचा पाऊस पडला आहे. पावसात धावपट्टीवर हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तूही पडल्या. त्यामुळे विमानतळावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. 

रशियाच्या याकुस्क विमानतळावर धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना एका विमानाचा दरवाजा उघडा राहिला. त्यामुळे विमानातील तीन हजार किलो सोने, हिरे आणि इतर धातूंची धावपट्टीवर बरसात झाली. या घटनेची माहिती मिळताच विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावरील एका गावात विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. 

विमानाच्या पंख्यातील बिघाडामुळे सोनं विमानातून बाहेर पडले असून, विमानातील सर्व क्रु मेंबर्स सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विमानातून किती सोने आणि इतर मौल्यवान धातू पडले याचा ठोस आकडा उपलब्ध झाला नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Gold Bars Reportedly Fell From An Airplane