कॅनडात भारतीय अधिकाऱ्यांना गुरुद्वारात 'नो एंट्री'

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

14 गुरुद्वारामध्ये कोणालाही याबाबतची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, यासाठी कोणत्याही प्रकारे लेखी सूचना देण्यात आलेली नाही. मात्र, समाजातील प्रत्येकाला याबाबतची माहिती आहे.

अमृतसर : कॅनडाच्या ओन्टारियो येथे गुरुद्वार व्यवस्थापन समितीने भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे. भारतीय अधिकारी धार्मिक विधीमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत असल्याने याबाबतचा निर्णय ब्राम्पटन येथील जोत परकाश गुरूद्वाराने घेतला आहे.

जोत परकाश गुरुद्वाराने कॅनडातील 14 गुरुद्वारांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, या समितीने कोणत्याही गुरुद्वारात वैयक्तिक भेटीसाठी याबाबतची फी देणाऱ्या कोणत्याही भारतीयाला बंदी घालण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले आहे. याबाबत अकल तख्त जठेदर ग्यानी गुरबचन सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, ''या निर्णयाची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकत नाही''. 

कॅनडातील गुरुद्वार समितीचे प्रवक्ते अमरजित सिंग मन यांनी सांगितले, की ''आम्ही याबाबतचे पत्रक काढले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना बोलण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. तसेच यापूर्वीही या 14 गुरुद्वारामध्ये कोणालाही याबाबतची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, यासाठी कोणत्याही प्रकारे लेखी सूचना देण्यात आलेली नाही. मात्र, समाजातील प्रत्येकाला याबाबतची माहिती आहे.

आता आम्ही याबाबतची जाहीर सूचना देत आहोत. आम्हाला निर्देशनास आले, की भारत सरकारचे अधिकारी आमच्या कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे अशाप्रकारची बंदी आणण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international 14 gurdwaras in Canada ban entry of Indian officials