फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटून चौघांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

251 लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक फिलिपीन्सच्या समुद्रात बुडाली. यादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला असून, 166 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अद्याप 88 जण बेपत्ता झाले आहेत

(अर्मांड बलिलो, तटरक्षक दलाचे प्रवक्ते)

मनीला : फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. त्या बोटीत 251 लोक असल्याची माहिती मिळत आहे. यात अनेकांना जलसमाधी मिळाली. ही घटना मनीलापासून सुमारे 70 किलोमीटर पूर्व दिशेला असलेल्या रिअल शहराजवळच्या समुद्रात घडली. 

या दुर्घटनेची माहिती मिळताच बोटीतील नागरिकांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाच्या चार बोटी दाखल झाल्या. या बोटीत 251 लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 166 जणांना वाचवण्यात यश आले असून, चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यातील 88 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील लोकांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत करण्यात येणार आहे.

याबाबत तटरक्षक दलाचे प्रवक्ते अर्मांड बलिलो म्हणाले, ''251 लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक फिलिपीन्सच्या समुद्रात बुडाली. यादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला असून, 166 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अद्याप 88 जण बेपत्ता झाले आहेत''.    

दरम्यान, ही दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील नागरिकांनी आजू-बाजूच्या बोटींचा सहारा घेत पाण्यातून बाहेर येत स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international boat hit sea philippines killing four people and 88 people missing boat