चीनी सीमेवर गस्तीसाठी भारताकडून होणार उंटांचा वापर

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीम-भूतान-तिबेट सीमेजवळच्या परिसरात चीनी सैन्य अद्यापही आहे. त्यामुळे भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली जात आहे. यासाठी लडाखमधील चीनी सैनिकांच्या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी भारताने उंटांचा वापर करण्याची तयारी केली आहे.

डोकलाम वादानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. तसेच चीनकडूनही सैन्य उभे केले गेले आहे. त्यामुळे या परिसरात आता उंटांच्या सहाय्याने लक्ष ठेवले जाणार आहे. सैन्याच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पांतर्गत एक आणि दोन बाक असलेल्या उंटांचा वापर केला जाणार आहे.

परिसरात लक्ष ठेवणारे हे उंट बॅक्ट्रियन जातीचे असणार आहेत. त्यांच्या मोठी क्षमता असल्याने त्यांच्या माध्यमातून नियंत्रण रेषेवर नजर ठेवली जाणार आहे. सुमारे 220 किलोपर्यंत वजनाचे सामान नेण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. या सर्व उंटांचा वापर गस्त घालण्यासाठी दारूगोळा आणि इतर सामानाची ने-आण करण्यासाठी केला जाणार असल्याने त्यांना याबाबतचे शिक्षण दिले जाणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international indian army to patrol china border in ladakh with camels international news