पार्क ग्युन हे यांना 30 वर्षे कैदेची मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

भ्रष्टाचार व पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दक्षिण कोरियाच्या माजी अध्यक्ष पार्क ग्युन हे यांना तीस वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी आज सरकारी वकिलांनी केली. 

सोल : भ्रष्टाचार व पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दक्षिण कोरियाच्या माजी अध्यक्ष पार्क ग्युन हे यांना तीस वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी आज सरकारी वकिलांनी केली. 

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पार्क ग्युन हे यांना मार्च 2017 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून त्या अटकेत आहेत. पार्क ग्युन हे या अध्यक्ष या नात्याने या प्रकरणात सर्वस्वी जबाबदार असून, त्यांना किमान तीस वर्षे तुरुंगवास तसेच, 110 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठवावा, अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे केल्याची माहिती सरकारी वकिलाने दिली. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत पार्क यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्‍यता आहे. 

आपली निकटची मैत्रीण चोई सुन सिल यांच्यासोबत मिळून पार्क यांनी सॅमसंग, लोट्टे आणि एसके या कंपन्यांना अनुकूल असे सरकारी धोरण तयार करण्यासाठी 52 दशलक्ष डॉलरची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने चोई सुन यांना यापूर्वीच दोषी धरत वीस वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Demad for 30 years Jailed Park Gyun