पाकला अमेरिकेकडून पुन्हा दणका, सुरक्षा सहाय्य मदत रोखली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वेळोवेळी याबाबत इशारा दिला होता. तरीदेखील पाकिस्तान अमेरिकेच्या दबावाला न जुमानता कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी कोट्यवधींची सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे.

नवी दिल्ली : अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत यापूर्वी रोखली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दणका देत पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वेळोवेळी याबाबत इशारा दिला होता. तरीदेखील पाकिस्तान अमेरिकेच्या दबावाला न जुमानता कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी कोट्यवधींची सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे. तसेच पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोवर आम्ही पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखत आहोत, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नोर्ट यांनी सांगितले.

 

Web Title: marathi news international news Donald Trump administration suspends over billion dollar aid to Pakistan