भारत-फ्रान्सच्या सहसंबंधाचे नवे युग सुरु करायचे : मॅक्रॉन

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

'भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे. भारत देश फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. फ्रान्स हा भारतासाठी युरोपात प्रवेश करण्यासाठी द्वार म्हणून ओळखला जावा, अशी आमची इच्छा आहे".

- इम्मानुएल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स

नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष इम्मानुएल मॅक्रॉन हे सध्या 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. भारतात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना मॅक्रॉन म्हणाले, ''दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे. भारत देश फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. या प्रदेशात (भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे''.  

मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रपती भवनातील भेटीनंतर मॅक्रॉन हे राजघाट येथे रवाना झाले आहेत. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये 14 विविध करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, ''काही महिन्यांपूर्वी मॅक्रॉन यांनी माझे स्वागत केले होते. आता मी त्यांचे भारतामध्ये स्वागत करत आहे. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये एक आध्यात्मिक जुने नाते आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता ही फ्रान्समध्ये नाहीतर भारताच्या संविधानामध्ये देखील आहे''.
 
मॅक्रॉन म्हणाले, ''भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे. भारत देश फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. फ्रान्स हा भारतासाठी युरोपात प्रवेश करण्यासाठी द्वार म्हणून ओळखला जावा, अशी आमची इच्छा आहे".

दरम्यान, उद्या (रविवार) 'आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स' दिल्ली येथे होणार असून, यासाठी भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञान बदली धोरणावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Marathi News International News France India Meet Narendra Modi Emmanuel Macron