भ्रष्टाचारप्रकरणी बेंजामिन नेतान्याहूंची इस्त्राईल पोलिसांकडून चौकशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

नेतान्याहू यांची पत्नी सारा यांनाही तेल अविव येथील पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. बेनेझ टेलिकॉम कंपनीचे भागधारक शाऊल इलोव्हिच हे सध्या पोलिस कोठडीत शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासोबत नेतान्याहू यांचे माजी प्रवक्तेही शिक्षा भोगत आहेत. 

जेरुसलेम : इस्त्राईलमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या बेझेक कंपनीतील भ्रष्टाचार समोर आला. या भ्रष्टाचारप्रकरणी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, अशी माहिती इस्त्राईल रेडिओच्या माध्यमातून देण्यात आली. इस्त्राईलच्या पंतप्रधानांची अशाप्रकारे चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

benjamin netanyahu

दूरसंचार कंपनी बेझेकमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. तसेच दोन भ्रष्टाचारप्रकरणात नेतान्याहू यांनी लाच घेतल्याचाही त्यांच्यावर संशय आहे. या पार्श्वभूमीवरही चौकशी केली जात आहे. सलग चार वेळेस पंतप्रधानपद भूषविलेल्या नेत्यानाहू यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, नेतान्याहू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले आहेत. तसेच या चौकशीबाबत पोलिस प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  

नेतान्याहू यांची पत्नी सारा यांनाही तेल अविव येथील पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. बेनेझ टेलिकॉम कंपनीचे भागधारक शाऊल इलोव्हिच हे सध्या पोलिस कोठडीत शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासोबत नेतान्याहू यांचे माजी प्रवक्तेही शिक्षा भोगत आहेत. 

दरम्यान, याप्रकरणात दूरसंचार मंत्रालयाचे माजी संचालक श्लॉमो फिल्बर यांनादेखील यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नेतान्याहू यांची चौकशी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Israeli police question PM Benjamin Netanyahu corruption case