रोहिंग्यांविरोधात बांगलादेशच्या आक्रमक हालचाली सुरु

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

म्यानमार लष्करी सैन्य आणि पोलिसांसह सुमारे 200 पेक्षा अधिक लोक सीमारेषेवर आले होते. तसेच यातील काहीजण मोर्टरसह सीमा कुंपणावर अवजड शस्त्रास्त्रांसह आले होते, अशी माहिती देण्यात आली. 

ढाका : बांगलादेशकडून म्यानमारच्या रोहिंग्यांविरोधात आक्रमक हालचाली केल्या जात आहेत. रोहिंग्या मुस्लिम ज्या भागात आश्रय घेत आहेत, त्याभागात बांगलादेशकडून सैन्य उभे करण्यात आले आहे, अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. तसेच याबाबत बांगलादेशकडून म्यानमारला समन्सही बजावण्यात आले आहे.  

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम गेल्या अनेक महिन्यांपासून जवळच्या भारत आणि बांगलादेश या देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. हजारो लोक सीमेवरील पट्ट्यात राहतात. ही कोणत्याही एका व्यक्तिची जमीन नाही. त्यामुळे या सर्वाला विरोध करण्यासाठी बांगलादेशकडून आक्रमक हालचाली केल्या जात आहेत. 

myanmar-bangladesh border

म्यानमार लष्करी सैन्य आणि पोलिसांसह सुमारे 200 पेक्षा अधिक लोक सीमारेषेवर आले होते. तसेच यातील काहीजण मोर्टरसह सीमा कुंपणावर अवजड शस्त्रास्त्रांसह आले होते, अशी माहिती देण्यात आली. 

म्यानमार सीमेवर रोहिंग्या मुस्लिमांना जबरदस्तीने परत पाठविण्यात आले, असे निर्वासितांच्या प्रश्नांसदर्भात कार्यरत असलेल्या संस्थेकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, जवळपास 5300 हून अधिक लोक ऑगस्टपासून सीमारेषेवर वास्तव्यास आहेत. यातील निम्म्याहून अधिक नागरिक दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. तसेच त्यानंतर शेकडो लोक सीमारेषेवर पुन्हा वास्तव्यास आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Rohingya Muslim Bangladesh Mynamar