भारतासोबतचे संबंध सुधारा : पाक लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लाहोर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता खुद्द पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानच्या खासदारांना भारतासोबत असलेले संबंध सुधारण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

परराष्ट्र संबंध हाताळण्यासाठी पाकिस्तानात लष्कराची परवानगी महत्त्वाची मानली जाते. तसेच त्यांचा शब्दही अंतिम समजला जातो. याशिवाय भारतासोबतचे संबंध सुधारावे, यासाठी अमेरिकेकडून जोर धरला जात आहे. त्यानंतर आता भारताबरोबर संबंध सुरळीत व्हावेत, यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतल्यास लष्कर तयार आहे. सिनेट कमिटीमध्ये खासदारांसमोर बोलताना बावजा यांनी हे आवाहन केले आहे.  

दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या संबंध हाताळण्यासाठी लष्कराची परवानगी मिळणे गरजेचे असते. त्यानंतर आता लष्करप्रमुखांनी संबंध सुधारण्यास सांगितले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international pakistani army chief supporting hafiz saeed kamar jawed bajwa