अखेर अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पाकिस्तानला मागील पंधरा वर्षांत 33 अब्ज डॉलरची मदत करून अमेरिकेने मूर्खपणा केला आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिका-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा इशारा दिल्यानंतर अखेऱ पाकिस्तानला दिली जाणारी 255 दशलक्ष डॉलर्सची लष्कर मदत रोखण्यात आल्याचे 'व्हाइट हाऊस'ने आज जाहीर केले.

आजच पाकिस्तानने अमेरिकेला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्याबाबत इशारा दिला होता. "पाकिस्तानला मागील पंधरा वर्षांत 33 अब्ज डॉलरची मदत करून अमेरिकेने मूर्खपणा केला आहे,' असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात आली आहे.

पाकिस्तान दहशतावादाबाबत काय भूमिका घेते, यावरच आता मदत करायची नाही, असे ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाकिस्तानला अनेकदा कडक इशारे देत मदत बंद करण्याचा इशारा दिला होता. तसेच संरक्षण भागीदार म्हणून असलेला दर्जा काढून घेण्याचीही धमकी दिली होती. तरीही पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठबळ देणे थांबविले नसल्याने नाराज अमेरिकेने ही कडक कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international trump makes pakistan pay for lies deceit blocks 255 million military aid donald trump