अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरिया 'लवकरच' सज्ज होईल : सीआयए 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

वॉशिंग्टन : 'येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियाकडे थेट अमेरिकेला लक्ष्य करू शकणारे अण्वस्त्र असेल', अशी भीती खुद्द अमेरिकेच्याच 'सीआयए' या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही कालावधीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांच्याकडून असणारा धोका हा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातील कळीचा मुद्दा असतो, असेही 'सीआयए'चे संचालक माईक पोम्पेओ यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

माईक पोम्पेओ म्हणाले, "अमेरिकेवर अण्वस्त्र डागू शकण्याची क्षमता उत्तर कोरियाकडे असू शकेल. ही भीती पुढील अवघ्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकते. आता आमचे मुख्य काम म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांला शक्‍य ती सर्व गोपनीय माहिती उपलब्ध करून देणे! यामुळे त्यांच्यासमोर निर्णय घेताना पुरेसे पर्याय उपलब्ध राहू शकतील.'' 

'उत्तर कोरियाविरोधात बळाचा वापर केल्याने या भागात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकते. याच भागात दक्षिण कोरिया आणि जपान हे अमेरिकेचे दोन महत्त्वाचे साथीदार आहेत. त्यामुळे या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे', असे पॉम्पेओ यांनी या मुलाखतीत सांगितले. 

लष्करी अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाने त्यांच्या लष्करी क्षमतेमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. किम जॉंग उन यांनी त्यांच्या लष्कराला सज्जतेचे आदेश देताना शस्त्रास्त्रांचे उत्पादनही वाढविण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत:, अण्वस्त्रांच्या निर्मितीवर भर देण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश
धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना​
ध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी​
ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...!​
सरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ​
महात्मा गांधींना हवं होतं अहिंसक विज्ञान​
स्मरण एका इतिहासाचे​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news North Korea nuclear warheads Kim Jong Un Donald Trump CIA