पाकिस्तानच्या वर्तणुकीत बदल नाही - अमेरिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

वॉशिंग्टन -  पाकिस्तानबाबत अमेरिका अजूनही नाराज आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाद्वारे पाकिस्तानला देण्यात येणारी अब्जावधी डॉलरची मदत बंद केल्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तणुकीत कोणताही निर्णायक बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे.

दक्षिण आणि मध्य आशियाच्या प्रधान सहायक उपमंत्री ऐलिस वेल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या वर्तणुकीत आतापर्यंत कोणताही निर्णायक बदल झालेला नाही. परंतु, याविषयी पाकिस्तानबरोबर सातत्याने संपर्कात राहणार असून, तालिबानचे समीकरण बदलण्यासाठी पाकिस्तानची भूमिका महत्वाची ठरू शकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेल्या काबूल संमेलनानंतर माध्यमांशी बोलताना वेल्स म्हणाल्या की, अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिका सहायकारी आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानसंबंध खूप महत्वाचे आहेत. अमेरिकेकडून या दोघांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pakistan america afghanistan taliban security assistance