परवेझ मुशर्रफ यांना अटक करा : न्यायालय

पीटीआय
शुक्रवार, 9 मार्च 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यामध्ये अटक करण्याचे आदेश त्रिसदस्यीय विशेष न्याय्यिक लवादाने आज दिले. मुशर्रफ यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. 

2007 मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी तत्कालीन लष्करशहा असलेल्या मुशर्रफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्यात मुशर्रफ यांना न्यायालयाने मार्च 2014 मध्येच दोषी ठरविले आहे.

पाकिस्तानात आणीबाणी लागू करून सर्वोच्च न्यायालयासह अनेक वरिष्ठ न्यायाधीशांना अटक करण्यात आले होते. मुशर्रफ यांनी मार्च 2016 मध्ये पाकिस्तानातून दुबईला पलायन केले होते. मे 2016 मध्ये त्यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pervez musharraf pakistan high court