दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 70 कोटींचे बक्षीस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मुल्ला फजलुल्लाह, अब्दुल वली आणि मनाल वाघ या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास अमेरिका 70 कोटींचे बक्षीस देणार आहे. अफगाणीस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने आता तीन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. 

मुल्लावर 5 मिलियन (32 कोटी) रुपयांचे बक्षीस ठेवले असून, अब्दुल वली व मनाल वाघ या दोन दहशतवाद्यांवर प्रत्येकी 3 मिलियन (प्रत्येकी 19 कोटी रुपये) चे बक्षीस ठेवले आहे. 

मुल्ला फजलुल्लाह

  • मुल्ला हा 'तहरीक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
  • अमेरिकेने अफगाणीस्तानवर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात मुल्लाचा मुलगा ठार झाला होता. तसेच आणखी 21 जणांचा मृत्यू झाला होता.  
  • अनेक दहशतवादी कटात त्याचा सहभाग आहे.
  • पाकिस्तानच्या मलाला युसूफजाईवर मुल्लानेच हल्ला केला होता. 
  • 2010मध्ये न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेयरवरही हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती. परंतु, त्यात तो अपयशी ठरला होता. 
  • मुल्ला ठार झाल्याचे वृत्त अनेकदा येत असले तरी, तो अफगाणीस्तानात लपल्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news reward for Pakistan Taliban leader Mullah Fazlullah america