ट्रम्प यांनी ट्विटरवरून बदलले परराष्ट्रमंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

वॉशिंग्टन -  'सीआयए'च्या संचालक पदी माइक पोम्पेओ यांची नियुक्ती करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले. विशेष म्हणजे टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर असतानाच, ट्रम्प यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. 

टिलरसन यांच्याशी ट्रम्पयांचे अनेक दिवसांपासून मतभेद होते. या पार्श्वभूमीवर, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले. 

ट्रम्प यांनी ट्विट करताना 'सीआयएचे संचालक माइक पोम्पेओ नवे परराष्ट्रमंत्री असतील. ते ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतील,' असे म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांना पोम्पेओ यांच्या नियुक्ती बाबत सिनेटकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. 

व्हाइट हाउसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये पोम्पेओ हे परराष्ट्र मंत्रिपदासाठी अतिशय योग्य व्यक्ती असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे जगातील प्रतिष्ठेचे स्थान पुनर्स्थापित करणे, मित्रदेशांची आघाडी आणखी मजबूत करणे, शत्रू देशांविरोधातील कारवाईला बळ देणे, कोरियाचा द्विपकल्प अण्वस्त्रांपासून मुक्त करणे यामध्ये पोम्पेओ महत्त्वाचे योगदान देतील. त्यांच्या लष्कर, सीआयएचे प्रमुख आणि काँग्रेसमधील अनुभवाचा परराष्ट्रमंत्री म्हणून फायदाच होणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Trump fires Rex Tillerson as secretary of state