फ्लोरिडामधील गोळीबारानंतर वॉलमार्टच्या बंदूक विक्री धोरणात बदल

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 मार्च 2018

न्यूयॉर्क - फ्लोरिडामधील शाळेत झालेल्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता वॉलमार्ट या अमेरिकी कंपनीने आपल्या बंदूक विक्रीच्या धोरणात बदल केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बंदूक खरेदी करण्यासाठी वयाची अट घालण्यात आली असून, 21 वर्षे पूर्ण असलेल्यांनाचा आता बंदूक खरेदी करता येणार आहे. 

या शिवाय कंपनीने आपल्या संकेतस्थळावरुन एअरस्पॉट बंदूकी, रायफल्स आणि खेळण्यातल्या बंदूकादेखील विक्रीसाठी काढून टाकल्या आहेत. या व्यतिरिक्त अमेरिकेतील डिक्स स्पोर्टिंग गुड्स या कंपनीने देखील बंदूकी आणि दारुगोळ्याशी संबंधीत मचकूर असणाऱ्या मासिकांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, फ्लोरिडामध्ये झालेल्या गोळीबारनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी लवकरच कयदा होण्याची गरज असल्याचे म्हटले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news walmart Gun Sales Policy