फेसबुक सोडणार नाही:  मार्क झुकेरबर्ग

वृत्तसंस्था
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, असे फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्गवर दबाव आणला आहे. फेसबुककडून वैयक्तिक माहिती (डेटा लिक) उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र आता झुकेरबर्गने राजीनामा देणार नसल्याचे आणि निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
मंगळवारी अमेरिकी माध्यमांशी बोलताना मार्क झुकेरबर्ग म्हणाला की, 'जुलैपासून फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर सुमारे ४० टक्के घसरला आहे. असे असताना फेसबुक सोडण्याची ही योग्य वेळ नाही. कंपनीत मी कायमच राहणार नाही, मात्र सध्याच्या परिस्थितीत फेसबुक सोडून देण्यात  काहीच अर्थ नाही. कंपनी मी चालवतो त्यामुळे इथे जे काही घडते, त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे.' फेसबुकने विरोध करणाऱ्यांविरोधात डिफायनर्स या पीआर कंपनीची सेवा घेऊन मोहीम सुरु केली होती, असे बोलले जात होते. मात्र फेसबुकने हे आरोप फेटाळून लावले आहेत. झुकेरबर्गला राजीमाना देण्यास ट्रिलियम अॅसेट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जॉनस क्रॉन यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mark Zuckerberg says no plans to resign from Facebook