esakal | राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी दंगल उसळण्याची शक्यता; मार्क झुकरबर्गचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

mark zuckerberg

कॅपिटल हिलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात झुकरबर्ग म्हणाले की, देशाची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे निवडणुकीचे निकाल समोर येण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात. याकाळात सामाजिक अशांतीची जोखीम निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्यासारख्या कंपनीला पूर्वीपेक्षा अधिक सजग राहुन काम करायला हवे.  

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी दंगल उसळण्याची शक्यता; मार्क झुकरबर्गचा इशारा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

US Election 2020  अमेरिकतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Election) अवघे काही दिवस उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातील लोकप्रिय माध्यम असलेल्या फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे. मतमोजणीला अधिक वेळ लागणार असून याकाळात दंगल उसळण्याची शक्यता झुकरबर्ग यांनी व्यक्त केली आहे. या दरम्यान सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तसेच फेक गोष्टीचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

कॅपिटल हिलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात झुकरबर्ग म्हणाले की, देशाची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे निवडणुकीचे निकाल समोर येण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात. याकाळात सामाजिक अशांतीची जोखीम निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्यासारख्या कंपनीला पूर्वीपेक्षा अधिक सजग राहुन काम करायला हवे.  

माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे दुसऱ्यांदा बोहल्यावर; ब्रिटिश मैत्रिणीसोबत थाटला संसार

राजकिय जाहिरातींचा वाद

इलेक्शन डे (Election Day) च्या एक दिवस अगोदर पेड जाहिराती बॅन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी फेसबुकवर आरोप केले होते. फेसबुक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. यासंदर्भात फेसबुकचे उत्पादक व्यवस्थापक रॉब लॅथर्न यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टिकरण दिले होते. या प्रकरणातील चुकीच्या पद्धतीने  थांबवण्यात आलेल्या जाहिरातीसंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत, असे त्यांनी म्हटले होते.    

हेही वाचा - पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO
 
पुढच्या आठवड्यात फेसबुकची अग्निपरीक्षा

झुकरबर्ग म्हणाले की,  'पुढील आठवडा फेसबुकसाठी अग्नि परीक्षेचा काळ असेल. आपल्या कंपनीच्या कार्यपद्धतीचा अभिमान वाटतो. 3 नोव्हेंबरनंतरही आपले काम सुरुच राहिल. लोकशाही प्रक्रियेतील  सुरक्षा आणि लोकांचा आवाज जगापर्यंत पोहचवण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने लढा सुरुच ठेवायचा आहे' यापूर्वी फेसबुकवर अमेरिकन निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोप झाले आहेत. याप्रकरणात फेसबुकला टीकेला समोरे जावे लागले होते.   

loading image
go to top