esakal | पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

j p nadda.

पाकिस्तानचे खासदार सादिक यांचा हा कबूलीजबाबाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेतील एका भाषणात पाकिस्तान मुस्लिम लीग-एन चे नेते अयाज सादिक यांनी असा खुलासा केलाय की भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता. हल्ल्याची गोष्ट ऐकून तत्कालिन पाक सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथरायला लागले होते. सादिक यांचा हा कबूलीजबाबाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला शेअर करत भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर आणि काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

हेही वाचा - हवं तर भाजपला मत देऊ पण 'सपा'ला चारीमुंड्या चित करु; मायावती अखिलेशवर संतापल्या

जेपी नड्डा यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय आणि म्हटलंय की, काँग्रेसच्या राजकुमारांना भारताच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाहीये. मग ते भारतीय सैन्य असो, सरकार असो किंवा आपले लोक असोत, त्यांच्या आपल्या कुठल्या गोष्टीवर विश्वास नाहीये. तर मग त्यांनी आता त्यांचाच विश्वासू देश पाकिस्तानचेच ऐकावे. आशा आहे की आतातरी त्यांचे डोळे उघडतील. 

भाजपा अध्यक्षांनी आपल्या  पुढच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, काँग्रेस आपल्याच सशस्त्र दलांना कमजोर करण्याच्या मोहिमेत आहे. कधी त्यांची चेष्टा करते तर कधी त्यांच्या शौर्यावर शंका घेते. त्यांनी हरप्रकारचा कुटील डाव केला जेणेकरुन आपल्या सेनेला अत्याधुनिक राफेल मिळू नयेत. मात्र, देशवासीयांनी अशा राजकारणाला नाकारत काँग्रेसला मोठा धडा शिकवला आहे. 

हेही वाचा - Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'

फेब्रुवारी 2019 मध्ये जेंव्हा पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बंदी बनवलं होतं तेंव्हा पाकिस्तानमध्ये एका उच्च स्तरीय बैठकीत तत्कलीन परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलं होतं की, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. हे ऐकून बैठकीत उपस्थित पाक सेना प्रमुख जनरल कमर जावेद  बाजवा यांचे पाय थरथरायला लागले होते. पाकिस्तानच्या संसदेतील खासदार अयाज सादिक यांनी हा दावा केला आहे. याच बैठकीत इमरान खान सरकारने विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे परत करण्याचा निर्णय घेतला होता. 

loading image
go to top