अब्जाधीश झुकरबर्ग यांची संपत्ती निम्म्याने घटली; श्रीमंतांच्या यादीत २०व्या स्थानी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mark Zukerberg

अब्जाधीश झुकरबर्ग यांची संपत्ती निम्म्याने घटली; श्रीमंतांच्या यादीत २०व्या स्थानी घसरण

नवी दिल्ली - मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मेटाव्हर्स घेऊन येणं खूपच महागात पडलं आहे. आधीच हे वर्ष अमेरिकन अब्जाधीशांसाठी कठीण गेले आहे, झुकरबर्ग यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. त्यांची संपत्ती आता निम्मी राहिली आहे.

हेही वाचा: डॉक्टरने होणाऱ्या बायकोचे न्यूड फोटो केले पोस्ट; संतप्त पीडितेने भावी नवऱ्याला संपवलं

या वर्षात आतापर्यंत मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत ७१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात ही सर्वात मोठी घट आहे. आता 55.9 अब्ज डॉलर्ससह, मार्क झुकरबर्ग जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या स्थानावर आहे. हे त्यांचे 2014 नंतरचे सर्वात खालचे स्थान आहे.

दोन वर्षांपूर्वी 38 वर्षीय मार्क झुकरबर्गची संपत्ती 106 अब्ज डॉलर होती. फक्त जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती होती. सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत $382 वर पोहोचल्यावर झुकरबर्गची यांची संपत्ती $142 अब्ज झाली होती.

हेही वाचा: Congress : अध्यक्षपदाची चर्चा सुरु असतानाच सोनिया गांधींचं 'या' बड्या नेत्याला दिल्लीत बोलावणं

दरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी मेटाला जगासमोर आणले. शिवाय कंपनीचे नाव फेसबुक आयएनसी बदलून मेटा केले. तेव्हापासून, त्यांच्या संपत्तीमध्ये सातत्याने घट होत आहे. अजुनही मेटा कंपनीला तंत्रज्ञानाच्या विश्वात आपला पाय रोवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

Web Title: Mark Zuckerbergs 71 Billion Wealth Wipeout Reveals Real World Struggle For Metaverse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..