इंग्लंडमध्ये शाळांत मास्कसक्ती

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने ब्रिटन सरकारने संसर्ग जास्त असलेल्या भागांतील शाळांत मास्कची सक्ती केली आहे. 12 वर्षांवरील विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य असेल.

लंडन - कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने ब्रिटन सरकारने संसर्ग जास्त असलेल्या भागांतील शाळांत मास्कची सक्ती केली आहे. 12 वर्षांवरील विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य असेल.

याआधी हा नियम शिथिल केला होता. त्यामुळे टीका करण्यात आली होती. परिणामी सुधारीत आदेश लागू करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) मास्क वापराचा सल्ला दिला आहे. त्यानुसार बदल करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण मंत्री गाविन विल्यमसन यांनी सांगितले की, मूलांनी शाळेत सुरक्षित परत येण्यास आमचे प्राधान्य आहे. प्रत्येक टप्प्यास आम्ही ताजा वैद्यकीय आणि शास्त्रीय सल्ला विचारात घेतला आहे. स्कॉटलंडमधील शाळांत मूले एकत्र येण्याच्या ठिकाणी मास्कची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ब्रिटन सरकारवर दडपण येत होते. अनेक मुख्याध्यापकांनी या आदेशात स्पष्टता नसल्याची तक्रार केली होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...तर मास्क वापरा
बाहेरील ठिकाणी तसेच संसर्ग जास्त असलेल्या विभागांमध्ये एकमेकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर राखता येणे शक्य नसेल तर प्रौढांप्रमाणेच 12 वर्षांवरील मूलांनी मास्क घालावा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने जारी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask compulsion in schools in England