
Israel Gaza Conflict
sakal
बार्सिलोना : गाझा पट्टीतील इस्राईलच्या लष्करी कारवाईविरोधात युरोपमध्ये वातावरण तापत असून आज इटलीतील रोम आणि स्पेनमधील बार्सिलोना व माद्रिद या शहरांमध्ये हजारो नागरिकांनी मोर्चे काढत इस्राईलच्या कारवाईचा निषेध केला. स्पेनच्या प्रत्येक शहरात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून आजची निदर्शने त्याचाच एक भाग होता.