लॉकडाउनमधून जग पडतेय बाहेर

May brings reopenings around the globe as virus toll climbs
May brings reopenings around the globe as virus toll climbs
Updated on

न्यूयॉर्क : कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबण्याची प्रतीक्षा न करता अनेक देश आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जागितक अर्थव्यवस्था ठप्प असून, मोठ्या प्रमाणात रोजगार जात आहेत. यामुळे कोरोनाच्या संकटापेक्षा अनेक देशांना आर्थिक परिणाम फार मोठे असल्याचे जाणवत आहे.

अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांनी बेरोजगार असल्याचा दावा केला आहे. हॉटेल, रेस्टॉरन्ट, बांधकाम प्रकल्प आणि उत्पादन क्षेत्राला फटका बसल्याने युरोपच्या अर्थव्यवस्थेची 3.8 टक्के घसरण झाली आहे. आर्थिक पातळीवर निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक देश आता लॉकडाउनमधून टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्यासाठी पावले उचलत आहेत. 

चीनची "फॉरबिडन सिटी' पुन्हा सुरू 
चीनने पर्यटकांचे आकर्षण असलेली "फॉरबिडन सिटी' पुन्हा सुरू केली आहे. सिटीची 1 ते 5 मे या कालावधीतील सर्व तिकिटे विकली गेली आहेत. एका दिवसासाठी फक्त 5 हजार जणांनाच तिकिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर बीजिंगमधील बागा आणि ऍम्युझमेंट पार्क पुन्हा सुरू झाले आहेत. 

अमेरिकेत शॉपिंग सेंटर सुरू 
अमेरिकेतील सायमन प्रॉपर्टी या सर्वाधिक मॉल चालविणाऱ्या समूहाने 10 राज्यांतील 49 शॉपिंग सेंटर आजपासून सुरू केली आहेत. टेक्‍सासमध्ये किरकोळ दुकाने, रेस्टॉरन्ट, मॉल आणि चित्रपटगृहे नागरिकांची संख्या मर्यादित ठेवून सुरू करण्यात येणार आहेत. नेब्रास्कामध्ये सलून 4 मेपासून खुली करण्याची घोषणी करण्यात आली आहे. ओक्‍लोहोमा सिटीतील भोजनगृहे सुरू झाली आहेत. 

बेरोजगारी दराचा अमेरिकेत उच्चांक 
अमेरिकेत बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 20 टक्के होता. याआधी 1930 मध्ये आलेल्या जागतिक महामंदीनंतर प्रथमच बेरोजगारीचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावेळी बेरोजगारीचा दर 25 टक्के होता. आताही बेरोजगारीचा दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेतील सहापैकी एका कामगाराचा रोजगार गेल्याचा अंदाज आहे. 

लॉकडाउनमधून बाहेर पडण्याच्या दिशेने 
- मलेशियातील बहुतांश व्यवहार सोमवारपासून होणार 
- थायलंडमध्ये किरकोळ दुकाने, सलून, रेस्टॉरन्ट लवकरच सुरू 
- जर्मनी, पोर्तुगाल आणि चेक प्रजासत्ताक निर्बंध कमी करणार 
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल डिस्टन्सिंगला मुदतवाढ देणार नाहीत 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांहून अधिक आहे. यामुळे बळी पडलेल्या नागरिकांची संख्या 63 हजारहून अधिक आहे. जगभरात 33 लाख जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यामुळे जगभरात बळी पडललेल्यांची संख्या 2 लाख 32 हजार आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत 34 हजारहून अधिक रुग्ण आढळले असून, 1 हजार 150 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक 10 हजार 500 रुग्ण सापडले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com