US Measles Outbreak : अमेरिकेतील मुलांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव; उच्चाटनानंतर प्रथमच प्रसार,रुग्णसंख्या एक हजारवर
Vaccine Awareness : २००० साली अमेरिकेतून गोवरचे उच्चाटन झाल्यानंतर २०२५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १,२८८ रुग्णांची नोंद झाली आहे. लसीकरण टाळणाऱ्या समुदायांमध्ये गोवरचा धोका वाढत असल्याचे 'CDC'ने स्पष्ट केले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत गोवरचा संसर्ग वाढत असून एक हजार २८८ रुग्णांची नोंद झाली असल्याचे ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ संस्थेने नुकतीच दिली. बालपणात होणाऱ्या या आजाराचे अमेरिकेतून २००० मध्ये उच्चाटन झाल्यापासून हे सर्वाधिक प्रमाण आहे.