esakal | 95 वर्षांची आजी सगळ्यांवर भारी! व्हिडिओ पाहून व्हाल आवाक
sakal

बोलून बातमी शोधा

oldest gymnast.

व्हिडिओ रॅक्स चॅपमॅन नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केलं आहे.

95 वर्षांची आजी सगळ्यांवर भारी! व्हिडिओ पाहून व्हाल आवाक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वाढत्या वयानुसार मानवाला चालण्या-फिरण्यासही अडचणी येतात. पण, 9 दशकांपेक्षा अधिक काळ जगलेल्या आणि आजही तरुणांप्रमाणे जिमनॅशस्टिक करत असलेल्या महिलेकडे पाहून तुम्ही काय म्हणाल. नक्कीच एकतर तुम्हाला विश्वास बसणार नाही, किंवा तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक वयस्कर महिला जिमनॅशस्टिकच्या मूव्ह अगदी सहजपणे करुन दाखवते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या महिलेचं वय आहे तब्बल 95 वर्ष. 

कोरोना पोहोचला सर्वत्र; सातव्या खंडावरही विषाणूचा प्रवेश

व्हिडिओ रॅक्स चॅपमॅन नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केलं आहे. त्यानंतर भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी याला रिट्वीट केलं आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वयस्कर महिलेचं नाव जोहाना क्वास आहे, त्या जर्मनीमध्ये राहतात. 95 वर्षाच्या जोहाना या वयातही एकदम फीट आहेत. जोहाना अगदी 20 वर्षाच्या मुलीप्रमाणे आपली कला दाखवत आहेत. व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. जोहाना यांच्या चेहऱ्यावरुन तुम्हाला कळेल, की त्या वयस्कर आहेत, पण त्यांच्या शरीराच्या वेगवान हालचाली पाहून तुम्हाला त्यांचा फिटनेस कळून येईल. 

रॅक्स चॅपमॅनने 23 डिसेंबर रोजी या व्हिडिओला शेअर केले होते. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. अगदी कमी कालावधीमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ही बातमी लिहित असताना या व्हिडिओला 10 लाख लोकांनी पाहिलं होतं, तर 33 हजार लोकांनी लाईक केलं होतं. रॅक्स चॅपमॅनचे ट्विट अनेकजण रिट्विट करत आहेत. आतापर्यंत 7 हजार जणांनी याला रिट्विट केलं आहे. 

व्हिडिओ पाहून अनेक लोक जोहाना क्वास यांचं कौतुक करत आहेत. त्यांचे तंदुरुस्ती पाहून अनेकांना त्या 95 वर्षांच्या नाहीत असंच वाटून गेलं. पण, त्या खरंच 95 वर्षांच्या अजून त्या खूप वर्षांपासून जिमनॅशस्टिक करतात. व्हिडिओ शेअर करताना, जगातील सर्वाधिक वयस्कर जिमनॅस्ट- जोहाना क्वास, त्या जर्मनीत राहतात आणि त्यांचं वय 95 वर्ष आहे. त्यांनी दाखवून दिलंय की वय केवळ एक नंबर आहे, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

loading image
go to top