QUAD नेत्यांच्या बैठकीला PM मोदी राहणार उपस्थित; महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा

Modi Will Attend Meeting of QUAD leaders
Modi Will Attend Meeting of QUAD leadersPM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) हे क्वाड (QUAD) नेत्यांच्या आभासी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक गुरुवारी (ता. ३) होणार आहे. मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत क्वाड लीडर्सही बैठकीत सहभागी होणार आहेत. ते हिंद-प्रशांतमधील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करतील.

मागच्या महिन्यात क्वाड आशियाई नाटो असल्याची कल्पना नाकारताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, काही प्रभावित पक्ष (इंटरेस्टेड पार्टीज) अशी उपमा देतात. त्यामुळे कोणीही त्यात अडकू नये. चार देशांचा हा समूह २१ व्या शतकातील अधिक वैविध्यपूर्ण आणि विखुरलेल्या जगाला प्रतिसाद देण्याचा एक मार्ग आहे. म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स (एमएससी) २०२२ मध्ये ‘व्यापक बदल? इंडो-पॅसिफिकमधील प्रादेशिक सुव्यवस्था आणि सुरक्षा’ या विषयावरील चर्चेदरम्यान जयशंकर यांनी सांगितले.(Modi Will Attend Meeting of QUAD leaders)

Modi Will Attend Meeting of QUAD leaders
किव्हमध्ये बाॅम्बच्या स्फोटांनी बातम्यांचे प्रसारण थांबले; व्हिडिओ रेकॉर्ड

क्वाड हा चार देशांचा समूह आहे. यामध्ये समान हितसंबंध व समान मूल्ये इंडो-पॅसिफिकच्या (Indo-Pacific) चार कोपऱ्यांवर स्थित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या जगातील कोणत्याही देशाला, अगदी अमेरिकेतमध्येही स्वतःच्या बळावर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता नाही, असे जयशंकर म्हणाले. चार देशांचा हा समूह आशियाई-नाटो असल्याचा धारणेला त्यांनी फेटाळून लावले. त्यांनी याला पूर्णपणे दिशाभूल करणारे म्हटले आहे. काही प्रभावित पक्ष आहेत जे अशी उपमा देतात, असेही ते म्हणाले.

आमचे संबंध २० वर्षांत सुधारले

आशियाई-नाटोच्या उपमांमध्ये पडू नका. तीन देश कराराचे मित्र आहेत म्हणून नाही. अधिक वैविध्यपूर्ण, खंडित जगाचा प्रतिसाद देण्याचा हा २१व्या शतकाचा मार्ग आहे. क्वाड हा यूएस, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समूह आहे. २०१७ मध्ये क्वाडची स्थापना झाली होती. २०२० नंतर बनवलेले नाही. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाडचे मित्र राष्ट्रांसोबतचे आमचे संबंध २० वर्षांत सुधारले आहेत. हे चार देश आहेत ज्यांना विश्वास आहे की, त्यांनी सहकार्य केल्यास जग एक चांगले स्थान असेल, असेही परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com