
मेहुल चोक्सीला दिलासा, डोमिनिकाने केस घेतली मागे
डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्या प्रकरणात फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीला दिलासा मिळाला आहे. अँटीगुआ आणि बारबुडा येथून अपहरण करुन डोमिनिकात (Dominica) आणल्याचे चोक्सी यांनी सिद्ध केले. मेहुल चोक्सीने डोमिनिकाला सांगितले, की ते आपल्या इच्छेविरुद्ध डोमिनिकामध्ये आणले गेले. मेहुल चोक्सीने (Mehul Choski) दावा केला, भारतीय गुप्तचर संस्था राॅचे एजंट्सने त्याचे अपहरण केले होते. (Mehul Choksi Get Relief, Dominica Withdraws Case)
हेही वाचा: गांजाच्या व्यसनापायी... तरुणाने चक्क स्वतःचे गुप्तांगच कापले
चौकशीने काय केला दावा ?
वास्तविक गेल्या वर्षी मे महिन्यात मेहुल चोक्सी अँटीगुआतून बेपत्ता झाला होता. जेथे तो २०१८ मध्ये आपला पुतण्या नीरव मोदींबरोबर पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर भारतातून पळून गेले होते.अधिकाऱ्यांनी ९०० किमीपेक्षा अधिक लांब डोमिनिकन द्विप समुहात त्याचा पत्ता लावला आणि २६ मे रोजी अँटीगुआ आणि बारबुडा येथून अवैधरित्या देशात प्रवेश केल्या प्रकरणी अटक केली गेली.
Web Title: Mehul Choksi Get Relief Dominica Withdraws Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..