esakal | अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस; बायकोही सोडणार साथ!
sakal

बोलून बातमी शोधा

donald melaniya

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचे 15 वर्षांचे संबंध संपण्याच्या मार्गावर आहेत.

अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस; बायकोही सोडणार साथ!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प Melania Trump या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया गेल्या 15 वर्षांपासून पती-पत्नी आहेत, पण मेलेनिया ट्रम्प यांच्यापासून वेगळे होण्यासाठी एक-एक मिनिट मोजत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर, ते जेव्हा व्हाईट हाऊस सोडतील त्यावेळी मेलेनिया घटस्फोट घेतील, असा दावा व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचे 15 वर्षांचे संबंध संपण्याच्या मार्गावर आहेत. मेलेनिया एक-एक मिनिट मोजत आहेत. आतापर्यंत मेलेनिया यांनी ट्रम्प यांना घटस्फोट न देण्याचे कारण म्हणजे ट्रम्प अजूनही सत्तेमध्ये आहेत आणि ते त्यांना नुकसान पोहोचवण्याचा पर्याय शोधून काढतील, असा दावा व्हाईट हाऊस संपर्क ऑफीसच्या माजी संचालक ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमन Omarosa Manigault Newman यांनी केला आहे. लंडनस्थित टॅबलॉईड डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

US Election: ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास काय होईल?

न्यूमन यांनी अनपेक्षितरित्या डिसेंबर 2017 मध्ये राजीनामा दिला होता. मेलेनिया यांच्या एका मित्राने सांगितलं की, ''डोनाल्ड ट्रम्प यांचा 2016 मध्ये विजय झाला तेव्हा मेलेनिया यांना त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत. त्यांना कधीही वाटलं नव्हतं ट्रम्प जिंकून येतील. मेलेनिया यांनी त्यावेळी तडजोडीतून आपले लग्न टिकवले. व्हाईट हाऊसमध्ये देखील डोनाल्ड आणि मेलेनिया यांचे वेगवेगळे बेडरुम होते.'' 

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्या लग्नाबद्दल अफवा असल्या तरी, मेलेनिया यांनी दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनीही आम्ही दोघे कधीही भांडत नसल्याचे म्हटलं होतं. दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना लवकरच व्हाईट हाऊस सोडावे लागणार आहे. 20 जानेवारी रोजी नव्या अध्यक्षांचा शपथविधी सोहळा पार पडेल. 


 

loading image