esakal | 'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण
sakal

बोलून बातमी शोधा

melania trump

गेल्या 6 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी US Capitol वर हल्लाबोल केला होता.

'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : जो बायडन यांच्या शपथविधीला आता केवळ एक दिवस बाकी आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची औपचारिकरित्या व्हाईट हाऊसमधून गच्छंती होईल. अमेरिकेची ही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली. या निवडणुकीमुळे अमेरिकन लोकशाहीचा कस लागला. याला कारणही तसंच होतं. ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या संदेशात अलिकडेच कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलंय की, प्रत्येक गोष्टीबाबत उत्साहित असणं काही गैर नाही मात्र, हिंसेचा आसरा कधीही घेतला जाता कामा नये.

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून आपलं शेवटचं म्हणणं मांडणाऱ्या मेलानिया ट्रम्प यांनी एका व्हिडीओ मॅसेजमध्ये म्हटलं की, प्रत्येक बाबतीत जोशपूर्ण असणं आवश्यक आहे मात्र, लक्षात ठेवा की हिंसा ही कोणत्याही गोष्टीचं उत्तर असू शकत नाही. तसेच हिंसेला कधीच योग्य ठरवलं जाऊ शकत नाही.

गेल्या 6 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी US Capitol वर हल्लाबोल केला होता. जबरदस्ती घुसखोरी करत हिंसा केली होती. ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निडवणुकीत घोटाळा झाल्याचे आरोप लावले होते. तसेच आपण पराभूत झालो नसल्याचा छोतीठोक दावा देखील सातत्याने केला होता. त्यांच्या अशा चिथावणीखोर वक्तव्यांनी त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला होता. पोलिस आणि समर्थक यांच्या धुमश्चक्रीत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - यंदाचा प्रजासत्ताक दिन खास; लढाऊ राफेल परेडमध्ये पहिल्यांदा दाखवणार आपली ताकद
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मेलानिया यांनी लोकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला. कोविडच्या प्रकोपात आपला जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केलं तसेच या लढाईत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. मेलानिया यांनी आपल्या 'BE BEST' या मोहिमेविषयी देखील माहिती दिली. या मोहिमेद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्यात येते.

loading image