esakal | यंदाचा प्रजासत्ताक दिन खास; 'राफेल जेट' परेडमध्ये पहिल्यांदा दाखवणार आपली ताकद 
sakal

बोलून बातमी शोधा

rafale jet.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 21 हेलिकॉप्टरसहित 15 लढाऊ विमाने आपली कसरत दाखवणार आहेत.

यंदाचा प्रजासत्ताक दिन खास; 'राफेल जेट' परेडमध्ये पहिल्यांदा दाखवणार आपली ताकद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 21 हेलिकॉप्टरसहित 15 लढाऊ विमाने आपली कसरत दाखवणार आहेत. परेडमध्ये कसल्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून वायुसेनेचे जवान दररोज सात ते आठ तास सराव करत आहेत. वायुसेनेच्या 2011, 2012, 2013 आणि मागच्या वर्षीच्या दस्त्याला बेस्ट मार्चिंग दस्त्याचा अवार्ड मिळाला आहे. वायुसेनेची संपूर्ण तयारी अशीच सुरुय आहे की या वर्षीही वायुसेनेला हा सन्मान मिळावा.

हेही वाचा - Petrol Diesel Price: आज पुन्हा झाली वाढ; जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील भाव

भारतीय वायुसेनेमध्ये अलिकडेच सामिल झालेले राफेल हे लढाऊ विमान देखील 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सामिल होणार आहे. तसेच फ्लायपास्टचा समारोप या विमानाच्या 'व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन'मधून उड्डाण करुन होईल. या फॉर्मेशनमध्ये विमान कमी उंचीवर उड्डाण करतं. ते सरळ वर जातं आणि त्यानंतर कसरत आणि कलाबाजी दाखवत एका उंचीवर स्थिर होतं.


वायुसेनेचे प्रवक्ता विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी म्हटलं की, फ्लायपास्टचा समारोप एका राफेल विमानाच्या 'व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशनने होईल.' भारताने गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी फ्रान्सने बनवलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांना खरेदी केल्यानंतर वायुसेनेची ताकद वाढली आहे. नंदी यांनी सांगितलं की, 26 जानेवारी रोजी फ्लायपास्टमध्ये वायुसेनेचे एकूण 38 विमान आणि भारतीय सैन्याचे चार विमान सामिल होणार आहेत. हे फ्लायपास्ट दोन भागात होईल. पहिल्या भाग परेड सोबत सकाळी 10.04 वाजल्यापासून ते 10.20 वाजेपर्यंत होईल तर दुसरा भाग 11.20 वाजल्यापासून ते 11.45 वाजेपर्यंत होईल. 
 

loading image
go to top