11 हजार जणांचा बळी आणि 3 शहर उध्वस्त करणाऱ्या चक्रिवादळाची गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1985 Bangladesh cyclone

11 हजार जणांचा बळी आणि 3 शहर उध्वस्त करणाऱ्या चक्रिवादळाची गोष्ट

बांग्लादेशात २५ मे १९८५ साली आलेल्या विध्वसंक चक्रिवादळात 11 हजार 69 जणांचा मृत्यू झाला होता. चितगाव, कॉक्स बाजार आणि नोआखली या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं. (1985 Bangladesh Cyclone )

या चक्रिवादळाचा १५४ कीलोमीटर प्रति तास इतका होता. बंगालच्या उपसागरात या चक्रिवादळाची निर्मिती झाली होती. स्थानिक रेडीओ स्टेशनवरुन २-३ दिवसांमध्ये येणाऱ्या चक्रिवादळाविषयी माहीतीही देण्यात आली होती. सरकार त्यांच्या गतिप्रमाणे मदत आणि बचावकार्यासाठी सज्ज होत होती. मात्र या चक्रिवादळाने कल्पनेपेक्षा अधिक राक्षसी रुप घेतलं होतं. चक्रिवाळाच्या तडाख्यात सगळ काही उधवस्त झालं होतं.

चक्रिवादळाच्या मार्गात येणारं सगळच वादळाने नष्ट केले होते. ७० किलोमीटरचा रस्ता पूर्णत: उखडला गेला होता. चक्रिवादळात ११ हजार जणांचा मृत्यू झाला होता. बंगालच्या खाडीत चक्रिवादळ निर्माण झाले होते. किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी ते जास्त शक्तिशाली झालं होतं.चक्रिवादळामुळे अतिमूसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती.

या वादळानंतर कॉलराची साथ आली आणि याचाही फटका बांग्लादेशला बसला. या घटनेला आज ३७ वर्ष पूर्ण होतायत. या चक्रिवादळाला ट्रॉपिकल स्टॉर्म 1 B हे नाव देण्यात आलं होतं. 22 मे 1985 ला बंगालच्या खाडीत या चक्रिवादळाची निर्मिती झाली होती. हे चक्रिवादळाचा बांग्लादेशाच्या किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी ताशी वेग १४० किलोमीटर प्रतितास इतका होता. या चक्रिवादळाबरोबरच अतिमुसळधार पाऊस झाला आणि पूरस्थिती निर्माण झाली. यातही अनेकजणांचा मृत्यू झाला . या चक्रिवादळामुळे सगळीकडे हाहाकार झाला.

या परिस्थितीचं वार्तांकन बीबीसी लंडनने केलं होतं. चक्रिवादळाच्या तडाख्यात अनेक गरिबांची घरं कागदासारखी उडाली होती. अनेकजण अनाथ झालेल होते. हुसेन मोहम्मद अर्शद हे बांग्लादेशचे राष्ट्रपती होते, तर अतर रहमान प्रधानमंत्री होते.राष्ट्रपती अर्शद यांनी संपूर्ण जगातून मदतीचा ओघ सुरु असल्याचं बीबीसी लंडनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. आज या घटनेला ३७ वर्ष पूर्ण झालेत.

Web Title: Memories Of 1985 Bangladesh Severe Cyclone Which Had Killed 11 Thousand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bangladeshCyclone
go to top