महिला आणि पुरुषांमध्ये कोण अधिक खोटारडे?, पाहाच... 

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. काही विशेष परिस्थितीत महिलांचे खोटे बोलण्याचे प्रमाण वाढते. कपडे खरेदीवेळी महिला मुख्यत्त्वे अधिक खोटे बोलतात, असे यामध्ये म्हटले आहे.

लंडन : खोटे बोलण्याबद्दल अनेकदा चर्चा केली जाते. "झूठ बोले कव्वा काटे' वगैरे वाक्‍यही प्रसिद्ध आहे. त्यातच महिला अधिक खोटे बोलतात की पुरुष, यावर अनेकदा वाद होत असतात. आता मात्र एका संशोधनातून याचे उत्तर मिळाल्याचा दावा केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनमधील पोर्टसमाउथ विद्यापीठातील अभ्यासकांनी याबाबत अनेकांशी बोलून आणि अभ्यास करून पुढील निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या मते, ज्या व्यक्ती खोटे बोलतात त्या उत्तम वक्ते असतात. अशा व्यक्ती इतरांच्या तुलनेत आपले मित्र, आपला परिवार किंवा आपल्या जोडीदाराशी अधिक खोटे बोलतात. पुरुष महिलांपेक्षा उत्तम पद्धतीने खोटे बोलू शकतात, असाही निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे. खोटे बोलणाऱ्या व्यक्ती मेसेजऐवजी समोरासमोर खोटे बोलण्याला अधिक पसंती देतात आणि सोशल मीडियावरही त्या फार बोलत नाहीत. एक पुरुष साधारणत: एका दिवसात तीनदा खोटे बोलतो. एका वर्षात पुरुष 1,092 वेळा खोटे बोलतात; तर महिला वर्षभरात 728 वेळा खोटे बोलतात. 

मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची यादी फुटली?

या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. काही विशेष परिस्थितीत महिलांचे खोटे बोलण्याचे प्रमाण वाढते. कपडे खरेदीवेळी महिला मुख्यत्त्वे अधिक खोटे बोलतात, असे यामध्ये म्हटले आहे. आयुष्य सुखकर करण्याच्या नादात अनेकदा खोटे बोलले जाते. अशातही पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक खोटे बोलतात, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men think they are better liars than women