Meta Fined: मेटाला मोठा दणका! स्पर्धा कायदा मोडल्याप्रकरणी बसला 153 कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meta fined 153 crore by turkish competition board for breaking competition law

Meta Fined: मेटाला मोठा दणका! स्पर्धा कायदा मोडल्याप्रकरणी बसला 153 कोटींचा दंड

फेसबुकची मालक कंपनी मेटाला तुर्कीचा प्रतिस्पर्धी कायदा मोडल्याबद्दल मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला सुमारे 346.72 मिलीयन टर्किश लिरा (अंदाजे रु. 153 कोटी) किंवा $18.63 मिलीयन दंड ठोठावण्यात आला आहे.

तुर्की प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी वैयक्तिक सोशल नेटवर्किंग सेवा आणि ऑनलाइन व्हिडिओ जाहिरात बाजारात अग्रगण्य स्थानावर आहे आणि कंपनीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या मुख्य सेवांद्वारे गोळा केलेला डेटा एकत्र करून प्रतिस्पर्धेत व्यत्यय आणला आहे. सध्या मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपवरील डेटा प्रायव्हसीवरून भारतीय स्पर्धा आयोगाकडून देखील चौकशी सुरू आहे.

बुधवारी META च्या प्रवक्त्याने या दंडाबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यामध्ये सांगण्यात आले की तुर्की प्रतिस्पर्धी प्राधिकरणाच्या निष्कर्षांशी सहमत नाहीत. प्रवक्त्याने सांगितले की META वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करते आणि लोकांना त्यांच्या डेटावर पारदर्शकता आणि नियंत्रण देते. कंपनी सर्व पर्यायांचा विचार करेल, असे देखील ते म्हणाले.

हेही वाचा: Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

तुर्की प्रतिस्पर्धी प्राधिकरणाने सांगितले की, मेटाला बाजारपेठेतील स्पर्धा रिस्टोर करण्यासाठी पुढील पाच वर्षांत उचलल्या जाणार्‍या पावलांचा वार्षिक अहवाल तयार करावा लागेल. कंपनीच्या 2021 च्या कमाईच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाचे म्हणेजे 2021 मध्ये, प्रतिस्पर्धी आयोगाने प्रथम व्हॉट्सअॅप आणि नंतर फेसबुकच्या विरोधात चौकशी सुरू केली. 2021 मध्ये, व्हॉट्सअॅपने नवीन गोपनीयता धोरण आणले आणि वापरकर्त्यांकडून परवानगी देखील मागितली गेली, त्यानंतरच स्पर्धा प्राधिकरणाने मेटा विरोधात चौकशी सुरू केली.

हेही वाचा: Galaxy A04s: सॅमसंग घेऊन येतेय कमी किमतीत आणखी एक जबरदस्त फोन; मिळतील 'हे' फीचर्स