#MeToo पुरुषांना सुद्धा पाठिंब्याची गरज: ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

न्यूयॉर्कः #MeToo ही मोहीम जगभरात गाजते असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. परंतु, आरोप करणाऱयांनी सबळ पुरावे द्यावेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्कः #MeToo ही मोहीम जगभरात गाजते असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. परंतु, आरोप करणाऱयांनी सबळ पुरावे द्यावेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर #MeToo मोहीम सध्या गाजत आहे. केनिया येथील दौऱ्यादरम्यान एका वृत्तवाहिने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना मेलानिया ट्रम्प म्हणाल्या, 'मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असेच मलाही वाटते. महिलांना माझा पाठिंबा असून, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. महिलाच नाही तर पुरुषांना सु्द्धा. पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी.'

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले आहेत. परंतु, पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमेही अनेक बातम्या वाढवून सांगताना दिसतात. काही बातम्या अशा प्रकारे सादर केल्या जातात ज्यांची पद्धत चुकीची आहे, असेही मेलानिया ट्रम्प म्हणाल्या.

दरम्यान, हॉलिवूडमधील लैंगिक शोषण, छळ, गैरवर्तनासंदर्भात गेल्या वर्षी #MeToo ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. #MeToo ही मोहिम सध्या जगभरात सुरू आहे. भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी अन्यायाला वाचा फोडली आहे. बॉलिवूडनंतर क्रीडा, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात हे वादळ घोंगावू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MeToo Melania Trump says sexual assault survivors need to provide really hard evidence to be believed