
मेक्सिकोतील जलिस्को इथं एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीची हत्या करण्यात आलीय. टीकटॉकवर लाइव्ह सुरू असतानाच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जापोपान शहरात ही घटना घडली असून वलेरिया मार्केज असं हत्या झालेल्या इन्फ्लुएन्सर तरुणीचं नाव आहे. ब्युटी सलूनमध्ये टिकटॉक लाइव्ह सुरू असतानाच तिच्यावर गोळीबार झाला.