Mexico Violence : ड्रग्ज तस्कराच्या अटकेनंतर मेक्सिकोत भीषण हिंसाचार; वाहनं, विमानतळांवर मोठा गोळीबार

लोपेझच्या अटकेनंतर टोळीच्या सदस्यांनी रस्ते अडवले, वाहनं जाळली आणि विमानतळावर हल्ला केलाय.
Mexico Violence
Mexico Violenceesakal
Summary

अमेरिकेनं फरार घोषित केलेला अमली पदार्थाचा तस्कर ओव्हिदिओ गझमन याला मेक्सिकोत गुरुवारी पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली.

मेक्सिको : अमेरिकेचा शेजारील देश मेक्सिकोमध्ये (America Mexico) हिंसाचार उफाळून आलाय. कुख्यात ड्रग माफिया 'एल चापो'च्या मुलाच्या अटकेनंतर सिनालोआ राज्यात दंगल उसळलीये. या संघर्षात आतापर्यंत तीन सुरक्षा जवानांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत.

अमेरिकेनं फरार घोषित केलेला अमली पदार्थाचा तस्कर ओव्हिदिओ गझमन याला मेक्सिकोत गुरुवारी पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली. ओव्हिदिओ हा सिनालोआ टोळीचा एकेकाळचा प्रमुख जोआकिन एल चापो गझमन याचा मुलगा असून त्याच्या अटकेनंतर मेक्सिको शहरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिनालोआमधील कुलियाकन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Culiacan International Airport) सशस्त्र कार्टेल लढवय्ये दिसत आहेत. सहा महिन्यांच्या पाळत ठेवण्याच्या ऑपरेशननंतर ओव्हिदिओ गुझमन-लोपेझला (Ovidio Guzman-Lopez) कुलियाकनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर त्याच्या वडिलांच्या ड्रग्ज गँगचा प्रमुख असल्याचा आरोप आहे.

Mexico Violence
Indian Army : जवानानं एकाच कुटुंबातील चौघांवर झाडल्या गोळ्या; आई-मुलगा ठार, सून-सासरे गंभीर जखमी

लोपेझच्या अटकेनंतर, टोळीच्या सदस्यांनी रस्ते अडवले, वाहनं जाळली आणि स्थानिक विमानतळावर हल्ला केला, असं बीबीसीनं वृत्त दिलंय. उड्डाणाच्या तयारीत असताना दोन विमानांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सिनालोआमधील तीन विमानतळांवर 100 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. राज्यपालांनी सांगितलं की, 18 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुझमन-लोपेझला 'द माऊस' म्हणूनही ओळखलं जातं. संरक्षण मंत्री लुईस क्रेसेनियो सँडोव्हल म्हणाले, ओव्हिदिओवर त्याच्या वडिलांच्या कुख्यात सिनालोआ कार्टेलचा गट नेता असल्याचा आरोप आहे.

Mexico Violence
Hindu Girls : हिंदू मुलीसोबत बोलणंच काय, फिरणंही बनलं कठीण; तरुणीसोबत मंदिरात आलेल्या मुस्लिमाला बेदम मारहाण

सिनालोआ कार्टेल ही जगातील सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी करणारी टोळी आहे. ओव्हिदिओचे वडील जोआकिन एल चापो गझमन 2019 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषी ठरल्यानंतर यूएसमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. एल चापो प्रकरणानं मेक्सिकोच्या ड्रग कार्टेलच्या कार्यपद्धतीबद्दल धक्कादायक खुलासे केले. सँडोव्हल म्हणाले, गुझमन-लोपेझला पकडण्यासाठी पाळत ठेवण्याच्या ऑपरेशनमध्ये अमेरिकन अधिकारी देखील सामील होते. त्याला आता मेक्सिको सिटीमधील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com