सागरी सूक्ष्मजीवांकडून होते विषाणूंची शिकार

वृत्तसंस्था
Tuesday, 29 September 2020

सूक्ष्मजीव हे जीवाणूंची ‘शिकार’ करत असल्याचे माहिती होते. पण या पुराव्यामुळे समुद्रातील जैविक पदार्थांच्या प्रमाणाबाबत संशोधन करणे अधिक सोपे जाणार आहे. 

न्यूयॉर्क - समुद्रात आढळणारे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे दोन प्रकारचे सूक्ष्मजीव हे जीवाणूंवर नव्हे, तर विषाणूंवर जगत असल्याचा आश्‍चर्यचकीत करणारा पुरावा संशोधकांना मिळाला आहे. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार, सूक्ष्मजीव हे जीवाणूंची ‘शिकार’ करत असल्याचे माहिती होते. पण या पुराव्यामुळे समुद्रातील जैविक पदार्थांच्या प्रमाणाबाबत संशोधन करणे अधिक सोपे जाणार आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेतील सिंगल सेल जिनोमिक्स सेंटर या सागरीशास्त्र संस्थेने याबाबत अभ्यास केला असून तो ‘फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या नव्या संशोधनाने विषाणू आणि या नव्या आढळलेल्या दोन सूक्ष्मजीवांच्या गटांबाबतच्या अभ्यासाला धक्का दिला आहे. एकपेशीय असलेले या दोन्ही सूक्ष्मजीवांना सागरी अन्नसाखळीत ‘प्रोटिस्ट’ म्हणतात. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार अनेक प्रोटिस्ट पेशींमध्ये अनेक विषाणूंचे डीएनए आढळले आहेत, मात्र जीवाणूंचा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे संशोधन संस्थेचे संचालक रॅमनस स्पेप्नॉस्कस यांनी सांगितले.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सविस्तर अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, हे सूक्ष्मजीव जीवाणूंची नव्हे, तर विषाणूंची शिकार करुन जगतात. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार, सागरी पर्यावरणातील विषाणूमुळे सूक्ष्मजीव बाधित झाल्यावर त्यांच्यातील रसायने समुद्रात मिसळतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Microorganisms live by preying on viruses not bacteria