
Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नडेला (Zain Nadella) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. तो २६ वर्षांचा होता. तो जन्मजात सेरेब्रल पाल्सीने (Cerebral Palsy) ग्रस्त होता. याविषयी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने माहिती दिली. नडेला यांनी स्वत: कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना इमेल करत झेनचे निधन झाल्याची माहिती दिली.
2014 मध्ये कंपनीचे CEO चे पद स्विकारल्यानंतर नडेला यांनी अपंगांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्च येथे झेन उपचार घेत होता या रूग्णालयातील पेडियाट्रिक न्यूरोसायन्स विभागात इतर मुलांना (Children) चांगले उपचार मिळावेत यासाठी नडेलांनी झेन नडेला एंडॉव्ड चेअरची स्थापना केली.
2014 मध्ये कंपनीचे CEO चे पद स्विकारल्यानंतर नडेला यांनी अपंगांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्च येथे झेन उपचार घेत होता या रूग्णालयातील पेडियाट्रिक न्यूरोसायन्स विभागात इतर मुलांना चांगले उपचार मिळावेत यासाठी नडेलांनी झेन नडेला एंडॉव्ड चेअरची स्थापना केली. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जेफ स्पेरिंग म्हणाले की, झेनला संगीतात चांगली अभिरूची होती. त्याचे स्मितहास्त, त्याने कुटुंबासाठी आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना दिलेला आनंद हा कायमचा लक्षात राहील.