

Middle East Crisis
ESakal
मध्य पूर्वेत सतत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वेकडील अनेक देशांमधील आपल्या दूतावासांमार्फत अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षाविषयक सूचना जारी केल्या आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मान, इस्रायलमधील जेरुसलेम आणि इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासांनी नागरिकांना संभाव्य तणाववाढीच्या शक्यतेने सतर्क राहण्याचा आणि गरज भासल्यास तात्काळ प्रदेश सोडण्यास तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.