स्थलांतरित हे लोक नव्हे, जनावरे : ट्रम्प 

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्थलांतरितांची तुलना जनावरांशी केली, तसेच अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यावरही "मंद' म्हणून टीका केली आहे. अमेरिका-मेक्‍सिको सीमेवरील परिस्थितीबाबत "व्हाइट हाउस'मधील एका बैठकीदरम्यान त्यांनी स्थलांतरितांबद्दलचा आपला राग व्यक्त केला.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्थलांतरितांची तुलना जनावरांशी केली, तसेच अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यावरही "मंद' म्हणून टीका केली आहे. अमेरिका-मेक्‍सिको सीमेवरील परिस्थितीबाबत "व्हाइट हाउस'मधील एका बैठकीदरम्यान त्यांनी स्थलांतरितांबद्दलचा आपला राग व्यक्त केला.

"आपल्या देशात अनेक लोक येतात आणि आपणही अनेक लोकांना दुसऱ्या देशात पाठवतो. लोक परत येतात आणि आपण आणखी इतर लोक पाठवतो.हा प्रकार सुरूच आहे. हे लोक नाहीत, जनावरे आहेत. हे सर्व आपल्या मंद कायद्यामुळे होत आहे. हा कायदा मी अधिक शक्तिशाली करणार आहे,' असे ट्रम्प या वेळी म्हणाले. 
 

Web Title: Migrants are not people its animal says trump